आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.७) शेतकरी महिलांना विविध विषयावर पंचायत समिती सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे. महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणातून सक्षमीकरणावर भर आहे. शिबिरात तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. वर्षा मरवाळीकर, विशेष तज्ज्ञ गणेश मंडलिक, खादी ग्रामोद्योग के. डी. बंदाई, आत्मा
विभागाचे एम. यु. सय्यद, आयसीआयसीआय बँकेचे जिल्हा व्यवस्थापक पराग आंबेवाडीकर, गरजे-पाटील, उद्योजक श्रावण रावनकुळे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी मनोज कवडे, धनाजी गोरे, अविनाश भैरट, सुनंदाताई वळसे, अर्चनाताई सावतकर, साईनाथ आकले, सुरज चव्हाण, महेश ढोणे आदींनी पुढाकार घेतला. तालुका व्यवस्थापक विवेक पवार यांनी प्रास्ताविक केले. उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका व्यवस्थापक बाबासाहेब नाईक यांनी आभार मानले.
फळबाग लागवड तंत्र
डॉ. वर्षा मरवाळीकर यांनी पोषण बागेचे महत्त्व, विविध प्रकार अन् व्यवस्थापनाची माहिती दिली. तज्ज्ञ गणेश मंडलिक यांनी फळबाग लागवड तंत्रज्ञानावर माहिती दिली. खादी ग्राम उद्योगाचे बंदाई यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती दिली. बँकेच्या व्यवस्थापकांनी गटांना विविध कर्जाविषयीची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.