आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:कसबे तडवळे येथील शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणीबाबत प्रशिक्षण; बीबीएफ पेरणी प्रशिक्षण आयोजित

कसबे तडवळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे हे गाव राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत निवड झाली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.८) या योजनेची माहिती व बीबीएफ पेरणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

कृषी विभागामार्फत वरील योजनेत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात प्रशिक्षण शिबीर घेऊन शेतकऱ्यांत जागरूकता निर्माण केली जात आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर शेतात घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बीजप्रक्रिया, बीबीएफ पेरणी यंत्राची पद्धत, महत्त्व व फायदे इंजिनिअर चव्हाण यांनी समजावून सांगितले. प्रशिक्षण शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तालुका कृषी अधिकारी वि. पी. लेणेकर, कृषी अधिकारी राम शिंदे, रविकांत आडसुळ, पर्यवेक्षक मोहिते, शेतकरी, बीबीएफ पेरणीयंत्र चालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...