आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रधारक:बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांना प्रशिक्षण ; उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत

लोहारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खेड येथे शुक्रवारी (दि.१०) राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकरी व ट्रॅक्टर चालक व मालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक सगर, कृषी सहायक एन. बी. पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणीचे फायदे, बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी, बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी ब्रह्मानंद पाटील, केशव पाटील, तुकाराम गव्हाळे, राजेंद्र पवार, बसवराज पाटील, उमेश जाधव, हनुमंत पाटील, बशीर शेख, सुभाष जाधव, दिलीप कुलकर्णी, शिवशंकर पवार, गुलाब शेख, सतीश पवार, सिद्धेश्वर पाटील, रामलिंग कापसे, बाजीराव पाटील, बालाजी बनसोडे, दादा पवार, गौतम बेलकुंडे, शरणाप्पा कडबाने, युवराज गव्हाळे, आयुब मुल्ला, बलभीम पाटील, शिवशंकर पवार, बाळासाहेब गव्हाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...