आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:गुंजोटी व कडदोरा गावांमध्ये परिवर्तनवादी ज्येष्ठा गौरी उत्सव ; बेटी बचाव, आधुनिक शेतीचे फलक

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन झाल्यानंतर सप्तमीला येणारा ज्येष्ठा गौरी सण महिलांनी पारंपरिक पध्दतीने रविवारी (दि.४) शहरासह तालुक्यात साजरा केला. काही कुटुंबातील महिला सदस्यांनी पारंपरिक लक्ष्मी पूजनाला फाटा देवून आधुनिक पध्दतीने लक्ष्मीपूजन करून समाजापुढे वैचारिक विचाराचा ठेवा ठेवला आहे.

तालुक्यातील गुंजोटी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा पवार यांनी पुरोगामी पध्दतीने ज्येष्ठा गौरीची पूजा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून अशा प्रकारे पूजन करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रेखा पवार व त्यांच्या कुटुंबाने आकर्षक सजावट करून जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या रुपातील महानायिकांचे पूजन करून समोर केलेल्या आरास, सजावटीत फराळाचे साहित्य, खेळणी व फळे ही पारंपरिक पध्दत टाळून विविध साहित्य, प्रबोधनपर, महापुरूषांच्या फोटो ठेवले. पर्यावरणाच्या संवर्धना सोबतच गडकोट किल्ला प्रतिकृती, स्त्रीभ्रूण हत्या, गर्भनिदान,लेक वाचवा, दहेज प्रथा अभिशाप, बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छता, पर्यावरण या माहितीचे फलक आरासात मांडण्यात आले.

पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश समाजाला यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ संदेश नाही तर केशर आंबा आणि राही जांभळाची रोपे हळदी कुंकवानिमीत्त महिलांपर्यंत पोहच करून संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रेखा पवार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

कडदोरा येथे जनजागृती,सामाजिक संदेशाचे फलक
कडदोरा येथेही सरपंच सुनंदाताई भरत रणखांब यांनी आरासाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आकर्षक सजावटी सोबतच वृक्ष लागवड व संवर्धन, जलसंधारण, आधुनिक शेती, लहान कुटुंब, सुखी कुटुंब, बेटी बचाव, बेटी पढाव, हुंडा घेणार नाही, देणार नाही, आधुनिक शेती, महिला अन किशोरवयीन मुलींना संतुलित आहार, आरोग्य या प्रकरच्या सामाजिक संदेश देणारे फलक यावेळी लावण्यात आले होते. घरोघरीची आरास पाहण्यासाठी तसेच हळदीकुंकवाच्या निमित्ताने अनेक महिला सहकुटुंब येत असतात. अशा प्रकारची आरास करून लोकांमध्ये समाज आणि पर्यावरण याबाबत साक्षरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. याचे अनुकरण अनेकांनी केले.

बातम्या आणखी आहेत...