आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:व्यसनमुक्तीसाठी योग कळंबमध्ये उपचार शिबिर

कळंब3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यश मेडिकल फाऊंडेशन संचलित येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्र येथे व्यसनमुक्तीसाठी योग उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये योग प्रशिक्षक अशिष झाडगे यांनी विविध आसने, प्राणायाम व प्रात्यक्षिके करून घेतले या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णमित्रांनी नमो नमो शंकरा या गीतावर नृत्य सादर केले तसेच केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम या गीतावर योगसाधना प्रात्यक्षिक सादर केले यावेळी व्यसनाचा प्रतिबंध व्यसनमुक्तीचे उपचार व व्यसनमुक्ती नंतर पुनर्वसन या सर्व उपचाराच्या प्रक्रियेमध्ये उपचार अतिशय प्रभावी ठरत असल्याचे डॉ. संदीप तांबारे यांनी सांगितले.

माणसाच्या जीवनात योगाचे किती महत्व आहे याचे स्वानुभवातून योग प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांनी रुग्णासमोर मांडले. कार्यक्रमासाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व रुग्ण मित्र ,कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.

बातम्या आणखी आहेत...