आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटवृक्षाचे वाटप:पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड; पर्यावरण साक्षरता वाढीसाठी एकोंडी जहागीरमधील महिलांना वटवृक्षाचे वाटप

उमरगा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड मोहिमेस व्यापक स्वरूप देण्यात येत असून, सर्वत्र वृक्षारोपण होत असताना मंगळवारी (दि.१४) वट पौर्णिमा व कारहुणवी सणाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने वडाचे रोप देऊन वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून नाही तर वडासह विविध झाडे लावून पतीचे निरोगी आयुष्य राहण्याचा संकल्प करा, असे आवाहन करत एकोंडी जहागीर गावात एक महिला एक वड हा उपक्रम राबवण्यात आला.

वाढती लोकसंख्या आणि सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. शासनाच्या वतीने गेल्या तीन वर्षांत वृक्ष लागवड चळवळ गतीमान केल्याने अलीकडच्या काळात वृक्ष लागवड व संगोपन यात वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. बेंदूर हा कर्नाटकी सण सीमावर्ती भागातील गावात प्रतिवर्षी कारहुणवी म्हणून साजरा केला जातो, याच दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाची पूजा केली जाते. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई पवार, सविताताई पवार, भाग्यश्री माने, मेघाताई पाटील, अंजली पाटील, संध्याताई पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...