आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

नळदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात देशाचे रक्षण केलेल्या माजी सैनिकांचा तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो स्फूर्तिदायक व कौतुकास्पद असल्याचे नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांनी म्हटले आहे.१५ ऑगस्ट रोजी संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला ऐतिहासिक वास्तु संगोपन योजनेअंतर्गत घेतलेल्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बारादरी येथे सीमेवर देशाचे रक्षण करून आलेले माजी सैनिक व मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक व जेष्ठ नागरीक भास्करराव मोहरीर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, माजी नगरसेवक शहेबाज काझी, शफीभाई शेख, मुश्ताक कुरेशी, बसवराज धरणे, हे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणुन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, पत्रकार विलास येडगे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख,उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, उपस्थित होते.

पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न
यावेळी बोलतांना नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांनी म्हटले की माजी सैनिकांचा सर्वांनाच अभिमान आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो स्फूर्तिदायक असल्याचेही शेवटी त्यांनी म्हटले.यावेळी बोलतांना कफील मौलवी यांनी म्हटले की किल्ल्यात जी विकासकामे केली आहेत त्याचे जतन करण्याचे काम करावे. टवाळखोरी करणाऱ्यांना आवर घालुन किल्ल्यात पर्यटक आणखी कसे वाढतील याबाबत प्रयत्न करावा.पर्यटक वाढले तर नळदुर्गच्या व्यवसायातही वाढ होईल.

बातम्या आणखी आहेत...