आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुवर्णपदक विजेत्या अरबाज शेख, सार्थक बोराडेचा सत्कार

पाथरूडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील पाथरूड ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पालकांसमवेत गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना ट्रॅक सूटसाठी आर्थिक मदत करण्यात आली.

ऑल्मिपिक असोसिएशन भोसरी पुणे येथे १४ ते २० डिसेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत पाथरूड येथील भाऊराव काटे विद्यालयातील विद्यार्थी अरबाज शेख याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून सुवर्णपदक प्राप्त केले. ही स्पर्धा भोसरी येथील संत ज्ञानेश्वर संकुल येथे घेण्यात आली होती. स्पर्धा महाराष्ट्र ऑल्मिपिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल शेख याला पुढील स्पर्धेसाठी दिल्ली येथे जाण्याची संधी मिळाली आहे. तसेच दुसरा विद्यार्थी सार्थक संतोष बोराडे याने शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत रोड रेस सायकलिंगमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. या याबद्दल त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पाथरूड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत वितरीत होण्यासाठी व शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून सांगण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गुप्ता व कृषी अधिकारी यांच्या सूचनेनुसार कृषी मित्र म्हणून समाधान भीष्माचार्य बोराडे यांची निवड झाली.

याबद्दल व खेळाडूंच्या निवडीबद्दल पाथरूड ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचा पालकांसमवेत मान्यवराच्या हस्ते सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विजय बोराडे, उपसरपंच प्राध्यापक तानाजी बोराडे, अण्णासाहेब पवार, पोलिस पाटील भरत बोराडे, विद्या विकास मंडळ पाथरूडचे अध्यक्ष बोराडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, ग्रामपंचायत सदस्य तिकटे, अशोक भसाड, धोंडीबा आठवले, युसूफ तांबोळी, गोकुळ तिकटे, अनिल तिकटे, रामकिशन जाधव, उत्तम बोराडे, भास्कर येडे, रामदास घोडके, महारुद्र बोराडे, समाधान दळवे, वैजिनाथ म्हमाने, विविध कार्यकारी सोसायटी संचालक, रामलिंग तिकटे, संतोष बोराडे, प्रशांत बोराडे, तात्यासाहेब भोरे, बाळासाहेब वडेकर, गौतम बोराडे, वैजिनाथ वीर, लिपिक अशोक बोराडे, कर्मचारी विलास जाधव, नागेश पवार, योगेश बोराटे, नागरिक उपस्थित होते.

ट्रॅकसूटसाठी आर्थिक मदत
स्पर्धेमध्ये, खेळाडूंनी विशेष कामगिरी केल्याबद्दल व खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट साठी आर्थिक मदत करणार असल्याचे उपसरपंच तानाजी बोराडे यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवक तिकटे यांनी केले तर आभार शिवाजी तिकटे यांनी मानले

बातम्या आणखी आहेत...