आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या मंदिर व्यवस्थापकाला तब्बल एक वर्षानंतर बेड्या, ऐतिहासिक दागीने चार्ज पट्टीत न आल्याने घोटाळा उघड

तुळजापूर / प्रदीप अमृतराव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मातेचा जामदारखाना व खजिन्यातील अतीप्राचिन ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या चांदीचे मौल्यवान अलंकार व नाणी गायबप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना तब्बल एक वर्षानंतर रविवारी (दि. १९) रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. नाईकवाडी यांच्या विरोधात १३ सप्टेंबर २०२० रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाईकवाडी यांच्या मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक म्हणून २९-११-२००१ ते ३०-११-२०१८ या कालावधीत गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देवीदास नाईकवाडी यांच्श्स विरोधात ४२०, ४०९, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ३८१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या मौल्यवान वस्तू गायब झाल्याची तक्रार
नाईकवाडी यांनी त्यांच्या कार्यकाळात पदाचा दुरूपयोग करत मंदिर संस्थानचा खजीना व जमादार खान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक व मौल्यवान ७१ प्राचीन नाणी सह भाविकांनी अर्पण केलेले ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तूंचा वैयक्तीक स्वार्थासाठी अप्रामाणिक अपहार, चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

मौल्यवान, ऐतिहासिक दागीने चार्ज पट्टीत न आल्याने घोटाळा उघड
नाईकवाडी यांचा १८ वर्षाचा धार्मिक व्यवस्थापक पदाच्या सेवा निवृत्तीनंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचा पदभार सिध्देश्वर इंतुले यांच्याकडे सोपवण्यात आला. या पदभार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तिघांची समिती नेमून त्यांच्या देखरेखीखाली पदभार सोपवण्याचे आदेश होते. त्यानुसार पदभाराची देवाणघेवाणही झाली. मात्र यावेळी मंदिर संस्थानच्या दप्तरी नोंद असलेले अनेक मौल्यवान, ऐतिहासिक दागीने चार्ज पट्टीतन आल्याने एकच गोंधळ उडाला होता.

बातम्या आणखी आहेत...