आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक पूजेला प्रारंभ:चंद्रग्रहणाच्या कालावधीत तुळजाभवानी देवी सोवळ्यात ; भाविकांची संख्या तुलनेने कमी

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रग्रहणा दरम्यान मंगळवारी सायंकाळी ६:०१ ते ६:१९ दरम्यान तुळजाभवानी मातेची मूर्ती सोवळ्यात ठेवण्यात आली. ग्रहण संपताच ६:३० ला सायंकाळच्या अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. मंगळवारी ग्रहणामुळे भाविकांनी देवधर्म टाळल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांची संख्या तुलनेने कमी होती.

ग्रहणामुळे सायंकाळी ५:४० ला पूजेची घाट देण्यात आली. ०६:१९ नंतर ग्रहण मोक्ष असल्याने ०६:३० ला देवीच्या सायंकाळच्या अभिषेक पूजेला प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा मंगळवार निमित्त देवीचा छबिना काढण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती छबिना वाहनात ठेवून प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. ग्रहणामुळे मंगळवारी भाविकांनी धार्मिक विधी करणे टाळल्याने मंदिरात भाविकांची संख्या कमी होती. दर्शन मंडप रिकामा असल्याने मंगळवारी केवळ एका तासात धर्म दर्शन होत होते. मुख दर्शन तसेच सशुल्क दर्शन दिवसभर रिकामे होते.

बातम्या आणखी आहेत...