आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी माळ:विविधरंगी अन् आकर्षक फुलांनी सजले तुळजाभवानी मातेचे मंदिर, पुण्यातील भाविकाकडून सहाव्या वर्षीही आकर्षक सजावट

तुळजापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरुवातीला केवळ ऑनलाइन पास असणाऱ्यांना सोडल्याने गोंधळ

नवरात्रात पुणे जिल्ह्यातील भाविक नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर-पाटील यांच्या वतीने कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दरम्यान, नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी हजारो भाविकांनी तुळजाभवानीच्या चरणी माथा टेकला तर रात्री उशिरा संबळाच्या निनादात तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला. छबिना वाहनांवर तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती ठेवून प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. यावेळी पुजारी, सेवेकरी, मानकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांची अडवणुकीची भूमिका कायम : नवरात्र महोत्सवातील पोलिस आणि महसूलच्या वादाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली आहे. सुरुवातीला केवळ ऑनलाईन दर्शन पास असणाऱ्या भाविकांनाच मंदिरात सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने घाटशिळ रोड वाहनतळ येथील दर्शन मंडपात गोंधळ उडाला. मात्र,मंदिर प्रशासनाने यामध्ये ऑफलाईन दर्शनाचीदेखील सोय असल्याची जाणीव पोलिसांना करून दिल्यानंतर ऑफलाईन दर्शन पास असणाऱ्या भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तणाव निवळला. दरवर्षी पोलिस आणि महसूल विभागामध्ये खटके उडतात. यावर्षीही ही परंपरा कायम राहिली. मात्र, पोलिसांची अडवणुकीची भूमिका कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे.

देशी-विदेशी फुलांची सजावट
रांजणगाव गणपती (ता. शिरूर, जिल्हा पुणे) येथील भाविक प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर-पाटील यांच्याकडून मंदिरातील फुलांच्या सजावटीचे सलग ६ वे वर्ष आहे. अॅँथेरियम, ऑरचिड या विदेशी फुलांसह देशी फुलांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...