आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठापना:तुळजाभवानी मातेची सोमवारी सिंहासनावर होणार प्रतिष्ठापना

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात पौर्णिमा सोमवारी (१० ऑक्टोबर) साजरी करण्यात येत असून सीमोल्लंघन सोहळ्यानंतरची मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार आहे. दरम्यान कोजागरी पौर्णिमा रविवारी (९ ऑक्टोबर) असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून प्रशासनासमोर सुविधा पुरवण्याचे आव्हान असणार आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाचा तिसरा व अखेरचा टप्पा अश्विन पौर्णिमा यात्रा शनिवारी (८ ऑक्टोबर) ते मंगळवार (११ ऑक्टोबर) साजरी होत आहे. पौर्णिमेविषयी भाविकांत संभ्रम असला तरी सोमवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार आहे. मंदिराची पौर्णिमा सोमवारीच साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री सोलापूरच्या मानाच्या शिवलाड तेली समाजाचा काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. छबिना मिरवणुकीनंतर महंतांच्या जोगव्याने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. मंगळवारी सकाळी मातेचीनित्योपचार पुजा, दुपारी महाप्रसाद व रात्री पुन्हा सोलापूरच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच लोक प्रतिनिधींनी भाविकांना सुविधा पुरवण्याची मागणी होत आहे.

भाविकांची होणार गर्दी शनिवारी (दि.८) सायंकाळपासून भाविक तुळजापुरात दाखल होतील. रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय मंगळवारी (दि. १२) सुध्दा भाविक गर्दी करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...