आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सविस्तर माहिती घेतली:तुळजाभवानी मंदिर संस्थानने जाणून घेतला बालाजी मंदिरातील कारभार

तुळजापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिर संस्थानच्या पथकाने तिरूपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्था, प्रसाद व्यवस्था, निवास व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता आदी विभागांना भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. मंदिर संस्थानच्या पथकात महंत पुजाऱ्यासह मंदिर संस्थान, नगर पालिका, पोलिस आणि सल्लागार कंपनीच्या अभियंत्यांचा समावेश आहे.

तुळजाभवानीच्या भक्तांचा वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी तुळजाभवानी मंदिराचे पथक तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले आहे. या पथकाने बुधवारी (दि.२३) व गुरुवारी (दि.२४) दोन दिवस बालाजी देवस्थानची पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन पास, दर्शन व्यवस्था, प्रसाद, निवास, पार्किंग, स्वच्छता, विद्युत आदी विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी देवस्थानच्या वतीने पथकाला माहिती देण्यात आली.

या पथकात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील, महंत तुकोजी बुवा, हमरोजी बुवा, तिन्ही पुजारी मंडळाचे प्रतिनिधी, अभियंता आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...