आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकंभरी नवरात्रोत्सव:‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

तुळजापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ, 8 दिवस चालणार विविध धार्मिक पूजा

श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास गुरुवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला. मुख्य यजमान बळवंत कदम यांच्या हस्ते मंदिरातील गणेश ओवरीत घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. ८ दिवस चालणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची गुरुवारी (दि.२८) शाकंभरी पौर्णिमादिनी होमकुंडात आहुतीने सांगता होईल.

गोमुख तीर्थ येथे घटकलशाची विधिवत पूजा करून यजमान बळवंत कदम यांनी घटकलश वाजतगाजत मंदिरात आणला. दुपारी १२ वाजता मंदिरातील गणेश ओवरीत घटस्थापना करण्यात आली. या वेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांच्यासह तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, शासकीय उपाध्ये बंडू पाठक, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अभियंता राजकुमार भोसले यांच्यासह सेवेकरी, मानकरी, पुजारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...