आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना वर्गणी गणेशोत्सव:तुळजाई गणेशात्सव मंडळ; अनेक सामाजिक उपक्रम व  स्थापनेपासून विना वर्गणी उत्सव

प्रदिप अमृतराव | तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतिक मंडळ स्थापने पासून सलग ३३ वर्षे विना वर्गणी गणेशोत्सव साजरा करत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तुळजाई मंडळाने ३३ वर्षात ३५५१ बॅग रक्त संकलन केले आहे तसेच २५ कोटी रूपयांचा ठेवी असणारी पतसंस्था उभारली आहे. याशिवाय मंडळाच्या वतीने वाचनालय चालवण्यात येत आहे.

१९८९ साली आदिनाथ तुळजापूरे, खंडू ताटे, मकसूद शेख, राजाभाऊ देशमाने, पंडीतराव जगदाळे, निलेश एकदंते, गोपीनाथ भोजने, स्व. बापू मोरे, शंकर ठेले, सादिक सय्यद आदींनी तुळजाई मंडळाची स्थापना केली. सर्व सभासदांनी ५०० रूपये जमा करून स्पीकर आणि मंडप सेट विकत घेतला. स्पीकर मंडप सेटच्या भाड्यातून सुरूवातीला मंडळ चालवले. तसेच या माध्यमातून सभासदांना रोजगार मिळवून देण्यात आला.

मोफत पशु वैद्यकीय शिबिर घेणारे तुळजाई मंडळ पहिले मंडळ ठरले आहे. मंडळाच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पशुवैद्यकीय शिबीर घेण्यात येत आहे. या शिवाय महिलांसाठी सर्व रोग निदान शिबीर, गर्भाशय कॅन्सर शिबीर, नेत्ररोग शिबीर, दुचाकी लर्नींग लायसन्स शिबिर, जनधन खाते उघडण्यासाठी बॅंक आपल्या दारी, आधार कार्ड काढणे शिबिर आदी उपक्रम राबवण्यात आले.

पतसंस्थेत ३५ कोटी ठेवी कालांतराने मंडळाच्या माध्यमातून तुळजाई पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. २५ कोटी रुपयांचा ठेवी जमा आहेत तर संस्थेचे भागभांडवल १ कोटी ३० लाख रुपये आहे. संस्था स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीमध्ये कार्यरत असून संस्थेकडून विविध व्यवसायिकांना १६ कोटी ४०लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

बोरी नदी खोलीकरण
तुळजाई मंडळाच्या वतीने लोकसहभागातून बोरी नदी खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले. उस्मानाबाद रोड ते लातूर रोड ३ कि. मी. लांबीचे खोली करण व रुंदीकरण करण्यात आले. या मध्ये शासकीय दरानुसार ३८ लाख रुपयांचे काम केवळ १० लाख ७० हजार रुपयांत करण्यात आले व या द्वारे १२ कोटी लिटर पाणी अडवण्यात आले आहे. या खोलीकरणा मुळे तुळजापूर खुर्द, सारा, शिंदे प्लाॅटींग आदी भागातील पाणी पातळीत वाढ होऊन कुपनलिकांचे पाणी वाढले आहे.

३७ रक्तदान शिबिरे
तुळजाई मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून १९९० पासून तब्बल ३७ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एकूण ३५५१ बॅगा रक्त संकलन करण्यात आले आहे. मुंबई वरील आतंकवादी हल्ल्याचा वेळी आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी १७६ बॅगा रक्त संकलन करण्यात आले होते.

दलित मित्र पुरस्कार
मंडळाला सन २००७ - ०८ सालच्या महाराष्ट्र शासनाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा हस्ते गौरवण्यात आले. १ लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारा अंतर्गत मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर दोघे असे एकूण चौघांना एस टी प्रवास मोफत आहे. जिल्हा पुरस्कार आदर्श मंडळ पुरस्कारही मिळाला.

बातम्या आणखी आहेत...