आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या गर्दीत वाढ:सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाईनगरी गजबजली

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाताळच्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाई नगरी भाविकांनी गजबजली आहे. मंगळवारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे चार तास लागले. सशुल्क दर्शनाला दोन तासांची वेळ लागत होती. वर्षाच्या अखेरपर्यंत भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी (दि.१२) पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजा होऊन तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी सहा वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, सकाळनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. यावेळी बहुतांश भाविकांनी गर्दीमुळे सशुल्क दर्शनाला पसंती दिली.

परिणामी, सशुल्क दर्शनाला दोन तास वेळ लागत होता. तर धर्म दर्शनाला तीन ते चार तास लागले. सायंकाळच्या सुमारास गर्दी ओसरली. रात्री उशिरा मंगळवारनिमित्त संभळाच्या कडकडाटात छबिना मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे बाजारपेठेत चैतन्य संचारले आहे. हळदी-कुंकूवासह प्रसाद, खेळणी, उपहारगृहात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत लाॅज व भक्तनिवास चालकांनी दर वाढवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...