आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारची सुटी व पौर्णिमेचा मुहूर्त साधत लाखांवर भाविकांनी तुळजाभवानी चरणी माथा टेकला. यामुळे पहाटेपासूनच तुळजापूर नगरी गजबजली. पहाटेपासूनच दर्शन मंडप भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. सशुल्क दर्शनास दोन तास लागत होते. गर्दीमुळे दुपारी मंदिर संस्थानला व्हीआयपी दर्शन बंद करावे लागले. गर्दीमुळे पहाटेच दर्शन मंडपाचे सर्व मजले भरून दर्शन रांगा बाहेर आल्या होत्या. दुपारी चार नंतर भाविकांची गर्दी ओसरली.
तत्पूर्वी पहाटे साडेचार वाजता तरणतीर्थ पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा पौर्णिमा निमित्त तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली. संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती छबिना वाहनात ठेवून प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा पूर्ण केली.
यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सुटी व पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. शनिवारी सायंकाळी शहरात भाविकांची गर्दी करण्यास प्रारंभ केला होता. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर संस्थानने वेळीच निर्णय घेत मंदिर पहाटे एक वाजता न उघडल्याने सकाळी गर्दी वाढून दर्शन रांगेवर ताण आला. मंदिर संस्थानने गर्दी पाहून मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याची मागणी पुजारी बाळासाहेब भोसले यांनी केली आहे.
मंदिर संस्थानचे दुर्लक्ष; दिवसभर दर्शन रांगा संथ गतीने
मंदिर संस्थानने दर्शन रांगा गतीने ओढण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रविवारी दिवसभरदर्शन रांगा संथ गतीने सुरू होत्या.परिणामी धर्म दर्शनाला तीन ते साडेतीन तास वेळ लागत होता. सशुल्क दर्शनाचा हाॅल भरून तीन प्रांगण भरले होते. त्याचवेळी मुख दर्शनाला दोन तासांचा कालावधी लागत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.