आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट प्रकल्प:तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांक

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत जाहीर क्रमवारीत तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर लातूर विभागात पाचवा क्रमांक पटकावला आहे. पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांसाठी सुविधा, लेखापरीक्षण अहवाल आदी निकषांवर क्रमवारी जाहीर करण्यात आली असून या यशाबद्दल सभापती विजय गंगणे यांनी संचालक, व्यावसायिक व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन - स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत राज्यातील बाजार समित्यांची सन २०२१ - २२ या वर्षांसाठी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. पणन संचालनालयाच्या वतीने राज्यातील ३०५ बाजार समित्यांच्या प्राप्त माहिती मधून क्रमवारी जाहीर करण्यात आली असून या मध्ये तुळजापूर बाजार समितीने संपूर्ण राज्यात ३५ वा क्रमांक पटकावला आहे. बाजार समिती चे सभापती विजय गंगणे व सचिव उमेश भोपळे यांनी संचालक मंडळाचा सहकार्याने यश मिळाल्याचे सांगितले.

१० एकर क्षेत्रफळावर असलेल्या तुळजापूर बाजार समिती आवारात १०० ते १२० आडत व्यापारी आहेत. या शिवाय बाजार समिती च्या मालकीची ६५ दुकान गाळे आहेत. संपूर्ण बाजार समितीला तारेचे कंपाउंड, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दोन मोठे गेट, शेत माल साठवण्यासाठी गोडाऊन, अंतर्गत सिमेंट रस्ते, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा बाजार समितीचा वतीने पुरवण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...