आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दीड वर्षापासून रखडलेल्या बाजार समिती निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. पुढील महिन्यात बाजार समिती निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी तर ८ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी व राजकीय दिशा ठरवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध होताच प्रत्यक्ष निवडणूक हालचालींना वेग येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार प्रक्रिया पार पडल्यास पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकालाची घोषणा करण्यात येईल. दरम्यान, कोरोना संकटानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. तुळजापूर बाजार समितीची मुदत १३ मे २०२१ रोजी संपली असून सध्या सहायक निबंधक सहकारी संस्था प्रशासक म्हणून काम पहात आहेत.
बदललेल्या राजकीय स्थितीत निवडणूक : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर तुळजापूर तालुक्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहेत. यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी शिंदे गट व महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.