आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची तयारी:तुळजापूर नगरपालिका निवडणूक, ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांची गरज

तुळजापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर नगर पालिका निवडणूकी साठी ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्या अनुषंगाने निवडणूक विभागाने सर्व शासकीय कार्यालये व लगतचा शाळेतून कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. दरम्यान निवडणूक विभाग निवडणुकीची तयारी करीत असले तरी इच्छुक उमेदवार मात्र संभ्रमात आहेत.

नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार कोणत्याही क्षणी निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पालिकेच्या निवडणुक विभागाने निवडणूकीची तयारी सुरू ठेवली आहे. निवडणूक प्रक्रिये साठी जवळपास ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालये तसेच शहरातील व लगतचा गावांतील शाळेतील कर्मचार् यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्याचवेळी काही शिक्षकांनी निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी पालिकेत धाव घेतली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर ५ कर्मचारी
शहरात नगर पालिका निवडणुकी साठी ३२ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर ०५ निवडणूक कर्मचार् यांची आवश्यकता असणार आहे. या शिवाय राखीव कर्मचारी धरून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिये साठी २०० कर्मचार् यांची आवश्यकता असणार आहे. या शिवाय इतर स्टाफ, क्षेत्रीय अधिकारी असे १०० ते १५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे.

इच्छुक उमेदवार संभ्रमात
दरम्यान निवडणूक विभाग निवडणुकी ची तयारी करीत असले तरी इच्छुक उमेदवार मात्र संभ्रमात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारचा पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा या मुळे निवडणुकीचा आघाडीवर सध्या तरी शांतता आहे.

बातम्या आणखी आहेत...