आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:तुळजापूर नवोदय विद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी संविधान भालेराव या विद्यार्थ्याने आंबेडकरांचे कार्य विशद केले.

विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना कशा पद्धतीने निर्माण केली हे सांगितले. त्यांचे कार्य असे महान होते असे सांगून एक उत्तम कायदामंत्री, पत्रकार, उत्कृष्ट वक्ते, उत्तम वकील, स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी कार्य केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन एच. जी. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...