आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारी:तुळजापूर रिक्षाचालकांना परिवहन खात्याकडून समज ; बैठक बोलावून नियम सांगितले

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र तुळजापुरात रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून भाविकांची लूट सुरू असल्याचा तक्रारी ची दखल घेत परिवहन विभागाने रिक्षाचालकांची बैठक घेत झाडाझडती घेतली. यावेळी रिक्षाचालकांनी वर्तणूक सुधारत विना तक्रार सेवा देण्याची हमी दिली. शहरातील जुन्या विश्रामगृहात आयोजित बैठकीला मोटार वाहन निरीक्षक प्रियदर्शनी उपासे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजिंक्य दुबाले यांची उपस्थिती होती. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते उत्तम अमृतराव व प्रकाश धट यांनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व केले. बैठकीला ४० ते ५० रिक्षाचालकांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना वाहन निरीक्षक प्रियदर्शनी उपासे यांनी रिक्षाला तातडीने मीटर बसवून घेण्यासह बॅच - बिल्ला तसेच ड्रेस कोड चे पालन करावे. ग्राहकाकडून योग्य भाडे घ्यावे, वाहतूक नियमाचे पालन करावे आदी सुचना दिल्या. दरम्यान परिवहन विभागाने शहरातील रिक्षा चालकांची सातत्याने तपासणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात मोठ्या संख्येने रिक्षा असून परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे मुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. शहरात नियमबाह्यपणे अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत आहे. या शिवाय भाविकांशी गैरवर्तनाचे प्रकार अनेकदा घडले असून रिक्षाला मीटर तसेच रिक्षाचालकांना बॅच बिल्ला नसल्याने तक्रार करण्यात अडचणी येतात. तीर्थक्षेत्र असल्याने हजारो भाविक रोज येतात. उत्सवाच्या काळात तसेच सुट्टीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचा फायदा रिक्षाचालक घेतात अशा तक्रारी आहेत. परिवहनच्या बैठकीमुळे पायबंद बसेल अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...