आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापूर:दर्शन पास स्कॅन करून मिळतो मंदिरात प्रवेश, गैरप्रकाराचा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात राजे शहाजी महाद्वार, दर्शन मंडप तसेच न्हाणी गेट आदी ३ ठिकाणी दर्शन पास स्कॅन करण्याची यंत्रणा आहे. पास स्कॅन करून फोटो व्हेरिफाय झाल्यानंतरच भाविकांना मंदिरात सोडले जाते. फोटो व्हेरिफाय न होणाऱ्या, आधार व्हेरिफिकेशन नसणाऱ्या भाविकांना तत्काळ बाहेर काढण्यात येत असल्याचे मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा प्रभारी व्यवस्थापक तहसीलदार सौदागर तांदळे यांनी स्पष्ट केले.

दर्शन पासमध्ये गैरप्रकार होत असून, यामध्ये मंदिर संस्थानचे कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी केला होता. या आरोपानंतर मंदिर संस्थानचे विश्वस्त तहसीलदार तांदळे यांनी सोमवारी(दि.१४) मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन साळुंके यांच्या आरोपांचे खंडन केले. या वेळी त्यांनी पत्रकारांना मंदिरातील दर्शन पास स्कॅन करण्याची प्रत्यक्ष यंत्रणा दाखवून माहिती दिली. या वेळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील, विश्वास कदम, राजकुमार भोसले, अनिल चव्हाण उपस्थित होते. मंदिर संस्थानचे कर्मचारी गैरप्रकार करताना आढळून आल्यास पुराव्यासह तक्रार करावी, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे तांदळे म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser