आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १४० तर सदस्यांच्या ३७७ जागांसाठी ८४४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. यावेळी पुण्या - मुंबई च्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. उद्या मंगळवार (दि. २०) सकाळी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडण्यासाठी रविवारी मतदान पार पडले.
सकाळी धिम्या गतीने सुरू असलेल्या मतदानाला १० नंतर गर्दी झाली. यावेळी रांगा लावून मतदान करण्यात आले. सकाळी ९:३० पर्यंत केवळ ८.८३% मतदान झाले होते. सकाळी ११:३० पर्यंत ३८.७०%, दुपारी १:३० पर्यंत ५१.६२% तर ३:३० पर्यंत ७०.८२% एवढे मतदान झाले होते. यावेळी पुण्या - मुंबई च्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. सरपंच पद थेट जनतेतून असल्याने निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली.
उद्या मंगळवारी मतमोजणी
नळदुर्ग रोड वरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्टस् हाॅल येथील निवडणूक कार्यालयात उद्या मंगळवार (दि.२०) सकाळी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी साठी एकूण १८ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी च्या १० फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबल वर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ सहाय्यक व १ मास्टर ट्रेनरची व्यवस्था आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.