आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:तुळजाभवानी मंदिरात विना परवाना घुसखोरी, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल

तुळजापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात विना परवाना घुसखोरी केल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार (दि. 7) रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी गुरुवार (दि. 07) दुपारी 11:58 ते 12:30 च्या सुमारास मंदिर कार्यालयात कोणतीही पूर्वकल्पना न देता राजे शहाजी महाद्वारमधून प्रवेश केला. जिल्हाधिकारी यांच्या सामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश बंदच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कोविडचा प्रसार आणि प्रचार होईल असे बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत 109, 188, 269 भादंवि अन्वये मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) प्रविण अमृतराव यांच्या फिर्यादीवरून तुषार भोसले आणि इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून मंदिरातील सीसीटीव्ही फूटेज पाहून कारवाई करण्यात आली आहे.

तुळजाभवानी भवानी मंदिर भाविकांसाठी गुरूवार (दि. 07) सायंकाळी 06 वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला होता. मात्र तुषार भोसले यांनी कुटुंबीयांसह दुपारीच मंदिरात प्रवेश केला. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कुलाचार पुजा करण्यास बंदी असताना ही तुषार भोसले यांनी तुळजाभवानी मातेचा गाभार्यात तब्बल अर्धा तास पुजा अर्चा व आरती केली.

बातम्या आणखी आहेत...