आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:शिवसेनेच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

मोहाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेच्या सत्तेला माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांनी सुरुंग लावला असून १५ पैकी १५ सदस्य आणि सरपंच अशी १६ जण युवा परिवर्तन ग्रामविकास आघाडीतून निवडून आले असून प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलचे खातेही उघडले नाही. कळंब पाठोपाठ मोहा हे गाव सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते.

दर पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत कधी मोठ्या फरकाने तर कधी एका सदस्यामुळे सतत संदीप मडके यांच्या पॅनलला सत्तेपासून दूर राहावे लागत होते. झालेला विकास आणि होणाऱ्या विकासाची आश्वासने घेऊन निवडणुकीत उतरून सतत चार टर्म मोहाची एकहाती सत्ता शिवसेनेकडे अबाधित होती. परंतु मागच्या पंचवार्षिक कार्यकाळात अंतर्गत वाद विकोपाला जाऊन एकाच पक्षाचे दोन पॅनल तयार झाले.

याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचा निकालात स्पष्ट झाले आहे. मोहातील जनतेने विरोधकामुळे विकास झाला नाही, हे कारण पुढे करू नये म्हणून एकही विरोधक सदस्य दिला नाही. त्यामुळे विकासाच्या गाडीला कोणताही अडथळा होणार नाही असे बोलले जात आहे. निवडणुकीत प्रस्थापितांना मतदारांनी जाे धक्का दिला तशी काही उदाहरणे यंदाच्या निवडणुकीत घडली आहेत.

विकास कसा असतो हे दाखवू
युवा परिवर्तन ग्रामविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त उच्चशिक्षित उमेदवार दिलेले असून ते सर्व मोहातील जनतेने स्वीकारले आहेत त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन. दिलेल्या आश्वासनाप्रमाने विकास काय असतो आणि कसा केला जातो हे काही दिवसात प्रत्यक्षात दाखवले जाईल.- संदीप गौतमराव मडके, युवा परिवर्तन ग्रामविकास आघाडी प्रमुख,मोहा

बातम्या आणखी आहेत...