आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकी, कारच्या दोन‎ अपघातात दोघांचा मृत्यू‎

धाराशिव‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकी‎ व कार अपघातात दोघांचा मृत्यू‎ झाला आहे. वडगाव (ता. कळंब)‎ येथील अनिल हरिश्चंद्र पवार (५९)‎ व प्रमोद अनिल पवार वडगाव‎ शिवारात बप्पा आगळे यांच्या‎ शेतापासून दुचाकीने (क्र. एमएच‎ २५, एएफ. ७९६५) जात होते.‎ दरम्यान, प्रमोद यांनी त्यांच्या‎ ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे‎ चालवली. यामुळे घसरून अपघात‎ झाला.

यात अनिल दुचाकीवरून‎ पडून गंभीर जखमी झाले. त्यांचा‎ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू‎ झाला. याप्रकरणी शिराढोण पोलिस‎ ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तसेच‎ माळकरंजा (ता. कळंब) येथील‎ संतोष सुरेश तुपसौंदरे (३२)‎ माळकरंजा ते ढोकी रस्त्यावरील‎ हॉटेल सूर्या जवळून ढोकी येथे‎ कारने (क्र.एमएच १२ बीव्ही‎ ९१४४) जात होते. दरम्यान, ट्रॅक्टरने‎ निष्काळजीपणे चालवून अचानक‎ ब्रेक मारल्याने संतोष यांच्या कारवर‎ आदळला. यात संतोष गंभीर जखमी‎ होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृताचे‎ वडील सुरेश तुपसौंदरे यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...