आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत बेंबळी येथे रोहयोच्या माध्यमातून शोषखड्डे तयार करण्यात आले होते. याची मजुरी हजेरी पत्रकावरील मजुरांच्या खात्यावर जमा होण्याऐवजी मोजक्याच मजुरांच्या खात्यावर गेल्याचे चौकशीअंती समोर आले. त्यामुळे यात सहभागी दोन ग्रामसेवकांसह तीन कंत्राटी कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
राेहयाेच्या शोषखड्ड्यांसह मातोश्री पाणंद रस्ते, शेत रस्ते आदी कामातही हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यात ग्रामसेवक एस. बी. सुर्वे, ए. व्ही. आगळे यांना निलंबित करुन कळंब व तुळजापूर पंचायत समितीत संलग्न केले. तसेच उस्मानाबाद पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक स्वाती कांबळे, सचिन वीर, राकेश सगर या कंत्राटी कामगारांची सेवा समाप्त करुन त्यांना खुलासे सादर करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरच नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यात दोषींनी मजुरांचे वेतन मोजक्याच १५ खात्यावर जमा करुन घेतली आहे.
हा प्रकार गंभीर असून इतर चौकशीत अनेक मुद्दे समोर आल्याने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी घरकूल, शेवगा लागवड, शोषखड्डे, सिंचन विहिर, मातोश्री पाणंद रस्ते, वृक्ष लागवड आदी योजनांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात आणखी काही प्रकरणे समाेर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.