आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्यांकन:बनावट सोने तारण करून दोन लाखांची फसवणूक ; पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन बँकेत बनावट सोने तारण करून २ लाख रुपये उचलल्याची घटना घडली. या प्रकरणी मूल्यांकन करणारा सोनार व कर्जदारावर परंडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील लतीफ शेख यांनी सोन्याच्या ६ बांगड्यांवर कर्ज घेण्यासाठी २७ जुलै २०२२ रोजी भाऊसाहेब बिराजदार अर्बन बँकेच्या परंडा शाखेत आले. बँकेच्या वतीने सोन्याचे मूल्यांकन करणारे सोनार अमोल शहाणे यांना बँकेत बोलावले. अमोल शहाणे यांनी बांगड्यांचे वजन केले असता ७३ ग्रॅम भरले. बट्टा काढून ५८.५६० ग्रॅम वजन भरले. शहाणे यांनी बांगड्या सोन्याच्या असल्याचे सांगितल्याने बँकेने लतीफ शेख यांना सोन्याच्या तारणावर दोन लाख कर्ज मंजूर केले तसेच पत्नी कायदेशीर वारस असल्याचे लिहून दिले.

कर्ज फेडीची मुदत २७ जुलै २०२३ असे नमूद केले होते. सोबत घोषणापत्र व शंभर रुपयांचा बॉन्ड देण्यात आला. लतीफ शेख यांनी एकदाही कर्जाचे हप्ते न भरल्याने बँक व्यवस्थापक भरत जाधव यांनी लतीफ शेख यांना बोलावले. अमोल शहाणे याने सिलबंद करून ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या मुख्य शाखा उमरगा बँकेचे सोनार दिक्षित यांनी बेनटेक्सच्या असल्याचे सांगितले. शाखा व्यवस्थापक भरत जाधव यांच्या फिर्यादीवरुन मूल्यांकन करणारे अमोल शहाणे व कर्जदार लतीफ शेख या दोघांवर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...