आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन महिन्यांपासून पालेभाज्या व फळ भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, आता पाऊस नसल्याने परतीच्या पावसाच्या शेवटी लावण्यात आलेला भाजीपाला बाजारात आणि मंडईत उपलब्ध झाल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले असल्याचे दिसून आले.
दोन महिंन्यापूर्वी २५ रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता दहा रुपयांत दोन जुड्या मिळत असल्याचे दिसून आले. मेथीसह शेपू आणि कोथिंबिरीच्या जुडीचेही दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला. पावसाळ्यापासून भाजीपाल्याचे दर कायम चढे असल्याचे चित्र शहर आणि परिसरात होते. एरवी दिवाळीपर्यंत भाजीपाला महाग आणि त्यानंतर त्याचे दर कमी होत होते. यंदा मात्र, हे चित्र उलटे असल्याचे दिसून आले. दिवाळीच्या दिड महिन्यानंतरही भाजीपाल्याचे दर कोणत्याही प्रकारे कमी झाले नसल्याचे दिसून आले.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परतीचा पाऊस मोठा आणि नुकसान करणारा असल्याने लावलेला भाजीपाला सडून जात होता. त्यामुळे येणारा भाजीपाला हा पूर्ण पणे विकसीत होण्यापूर्वीच तो खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत हाेते. काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड करुनही पावसामुळे हा भाजीपाला बाजारापर्यंत येऊ शकला नाही. मात्र, काही शेतकऱ्यांना तसेच काही भागात आवश्यक तेवढाच पाऊस पडल्याने त्या भागातील मोजकाच भाजीपाला बाजारात येत होता. त्यामुळे मोजकाच माल बाजारात येत असल्याने त्यास चांगला दर मिळाला होता. परिणामी जास्तीचे दर असूनही पर्याय नसल्याने भाजीपाला खरेदी केला जात होता. आता भाजीपाला दर घसरले असल्याने सर्वच जणांकडून भाजीपाला खरेदी करण्यात येत असल्याचे दिसून आले.
मोठ्या प्रमाणात आवक
सध्या पालेभाज्यांचे दर कमी असून मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन बाजारात येत असल्याने दर घसरले आहेत. काही फळ भाज्यांचे दर कायम असले तरी, पुढील आठवड्यात किंवा पंधरा दिवसात फळभाज्या बाजारात येण्याचे प्रमाण वाढणार असून त्यांचेही दर कमी होऊ शकतात. आतापासूनच फळभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी होण्यास प्रारंभ झाला. अशोक सुरवसे, शेतकरी तथा विक्रेता.
विक्रीही कमी दरामध्येच
आम्हाला पूर्वी जास्तीच्या दराने भाजीपाला मिळत होता. त्यामुळे ग्राहकांनाही त्याच दराने आम्ही विक्री करत होतो. त्यावेली भाजीपाल्याचे प्रमाण कमी होते. तसेच त्याची मागणीही कमीच होती. आता दर कमी झाल्याने भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे. पूर्वी सर्वच विक्रेत्यांकडे भाजीपाला नव्हता. आता सर्वांकडे भाजी विक्रीसाठी आहे. कुुसुम देवरे, भाजी विक्रेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.