आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:परंड्यात काँग्रेसच्या वतीने दुचाकी मोर्चा; महागाई व भाजपा सरकारचा निषेध

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने वेळोवेळी घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ परंडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दुचाकीवरून मोर्चा काढून महागाई व भाजपा सरकारचा निषेध नोंदवत तहसीलदार यांना मंगळवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अवाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे .मात्र हिटलरशाही वृत्तीचे केंद्र सरकार या बाबींवर एकही शब्द बोलायला तयार नाही .

तहसीलदार कार्यालय परंडा पासून गोल्डन चौक ते करमाळा रस्ता या मार्गे दुचाकी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅ.हनुमंत वाघमोडे, अॅ. श्रीकांत भालेराव, रमेशसिंह परदेशी, अॅड . अजय खरसडे, प्रा.मधुकर पाटील ,शिवाजी नाईकनवरे, उत्तरेश्वर ठवरे, जयसिंग बिडवे, महादेव पाटील, अॅ. सुनील शिंदे ,अवधूत पाटील, राजेंद्र परबत बाळासाहेब जाधव, महावीर इतापे,चव्हाण,समाधान लोंढे, हैदर शेख आदी उपस्थित होते.

गोल्डन चौक ते करमाळा रस्ता या मार्गे दुचाकी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड.हनुमंत वाघमोडे, अॅड. श्रीकांत भालेराव, रमेशसिंह परदेशी, अॅड . अजय खरसडे, प्रा.मधुकर पाटील ,शिवाजी नाईकनवरे, उत्तरेश्वर ठवरे, जयसिंग बिडवे, महादेव पाटील, अॅड. सुनील शिंदे ,अवधूत पाटील, राजेंद्र परबत बाळासाहेब जाधव, महावीर इतापे,चव्हाण,समाधान लोंढे, हैदर शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...