आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कळंबमध्ये बालोद्यानासमोर अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बालोद्यानासमोर पिकअप आणि दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे. मेहबूब निजाम पठाण रा. अंजनडोह (ता. धारूर ) असे मयताचे नाव आहे. दोन साखर कारखान्यावर नोकरीला असल्याने कळंब येथेच ते वास्तव्यास होते.

शहरातील बालोद्यानात समोरुन दुचाकीवरून जाताना पिकअपची दुचाकीला जोरदार धडक बसली, धडक बसताच मेहबूब पठाण हे जोरात रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...