आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून महिन्यात कोरोनाची चौथी लाट सुरू झाली व महिन्यात ४० कोरोना रुग्ण आढळले होते. जुलैच्या २९ दिवसात १९८ कोरोना रुग्ण आढळले. जूनपासून ५९ दिवसात २३८ कोरोना रुग्ण आढळले. तालुक्यात दोन महिन्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
जूनमध्ये सुरू झालेली चौथी लाट जुलैमध्ये धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. जुलैमध्ये २९ दिवसात सातच्या सरासरीने १९८ पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी (दि.२९) सकाळी आरटीपीसीआर चाचणीत चार आणि ५६ स्वॅब अहवालात सहा असे एकूण दहा पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरात जुनीपेठ, साईधाम, झोपडपट्टी, दत्त मंदिर, उपजिल्हा रुग्णालयाजवळ आणि ग्रामीण भागामध्ये बलसूरवाडी, कराळी, तुरोरी, जेवळी, बामणी (उस्मानाबाद) प्रत्येकी एक असे एकूण दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गाचे चौथ्या लाटेत आतापर्यंत २३८ पॉझिटिव्ह आलेत. शहरात १०७, ग्रामीण भागात १३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८० कोरोनामुक्त झाले असून ५७ रुग्ण मुरूम ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचार व गृहविलगिकरणात आहेत. दरम्यान, उमरगा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.