आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:उमरगा ; २ महिन्यांत २५२ कोरोना रुग्ण

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मागील दोन महिन्यात २५२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेत जून महिन्यात ४० तर जुलैमध्ये २१२ रुग्ण आढळले. अशाप्रकारे जूनपासून आतापर्यंत २५२ रुग्ण आढळले आहेत. तर जुलैमध्ये एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच कालावधीत २०० जण कोरोनामुक्त झाले असून सध्या ५१ जण उपचारात आहेत.

जुलै महिन्यात सातच्या सरासरीने २१२ पॉझिटिव्ह रुग्ण आले. रविवारी (दि. ३१) ९२ स्वॅब अहवालातून चार तर सोमवारी (दि.१) सकाळी आरटीपीसीआर चाचणीत तीन, स्वॅबमधून एक असे एकूण आठ कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयात तीन, डिग्गी रोड तर ग्रामीण भागात मुरूम, कदेर तांडा, कानेगाव, मटगी प्रत्येकी एक असे एकूण आठ कोरोना पॉझिटिव्ह आले. शहरात ११३ तर ग्रामीण भागात १३९ जण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २०० कोरोनामुक्त झाले असून ५१ रुग्ण मुरूम ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचारात आहेत.

बातम्या आणखी आहेत...