आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पॉझिटिव्ह:उमरगा ; ऑगस्टच्या अखेरच्या दिवशी ४ कोरोना पॉझिटिव्ह

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ऑगस्टच्या अखेरच्या दिवशी चार कोरोना पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या चौथ्या लाटेत मागील तीन महिन्यात ३७९ कोरोना पॉझिटिव्ह आले असून ३७४ जण कोरोनामुक्त झाले. सध्या चार रुग्ण उपचार व गृहविलगीकरणत आहेत.

तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४७ टक्के तर मृत्यूदर ०.२७ टक्क्यांवर आल्याने १.२६ टक्के रुग्ण उपचारात आहेत. तालुक्यात जूनमध्ये ४० रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये २१२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ऑगस्ट महिन्यात १२७ पॉझिटिव्ह आढळले. बुधवारी (दि.३१) उपजिल्हा रुग्णालय, मुरुम रुग्णालय व तालुका आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या ६३ स्वॅब अहवालातून ४ पॉझिटिव्ह आले. चौथ्या लाटेत ३७५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, साईधाम व ग्रामीण भागात मुरळी, जळकोट येथे प्रत्येकी एक असे चार पॉझिटिव्ह आढळले. यापैकी शहरात १५९ तर ग्रामीण भागात २२० कोरोना पॉझिटिव्ह आढळले. गुरूवारी (दि. १) ६६ स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून शुक्रवार (दि. २) रात्री उशीरापर्यंत अहवाल येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...