आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा:उमरगा शहर व परिसर; शेतशिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धोका वाढतोय

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अनेक गावांतील शेतशिवारात वीजेच्या तारा लोंबकाळत असल्याचे दिसून येत आहेत. उन्हाळ्यात वादळ सुटून अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे फड या तारेचे घर्षण होऊन जळून गेलेत. लोंबकळत असलेल्या तारांमुळे अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असून अनेक गावातील रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीलासामोरे जावे लागत आहे.

शहरातील अंतर्गत भागात व ग्रामीण भागात शेत-शिवारात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची संबंधित विभागास वारंवार माहिती देवून दुरुस्तीची मागणी होत असली तरी ही विद्युत तारा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होतानाचे दिसून येत आहे. शिवारातील समस्यासोबतच अनेक गावात अशीच परिस्थिती दिसून येत असल्याने साध्या वाऱ्यामुळेही ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा खंडित होतो.

विविध गावातील ग्राहकांनी वीज कंपनीकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली,मात्र तात्पुरती डागडुजी करत वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहरात अंतर्गत भागात विज वाहिनीची अवस्था बिकट झाली असून काही ठिकाणी तर हजार फूट अंतरापेक्षा अधिक अंतर पोल नसल्याने बांबूच्या आधारावर घरगुती विद्युत जोडणी देण्यात आली आहे. शहरात अनेक भागात नव्याने बांधकाम झाल्यामुळे विद्युतवाहिनी घराला लागूनच गेली असल्यामुळे धोका बळावला आहे. घरावरुन व घरालगत गेलेल्या विद्युत तारेमुळे या पूर्वी दोघांचा मृत्यू झाला तर विद्युत पोलवरील गुंतागुंतीचे विद्युत जोडणीमुळे झिरो लाईनमनही दगावले तर काही जखमीही झाले आहेत.मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आजही धोका कायम आहे.

जकेकूरचे करीमसाब शेख म्हणाले की, गेल्या अडीच वर्षापासून शेतातील विजेच्या तारा अशाच लोंबकळत असून शेतात पेरणी करताना आणि अन्य कामे करताना पशु,माणसाला धोका होण्याची शक्यता असल्याने लाईनमन व ऑफिसला तक्रार करूनहि दखल घेतली जात नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर यांना आठवण होणार की काय. गेल्या उन्हाळामध्ये बैलगाडीला विज तारा अडकून धोका होण्याची शक्यता होती. गतवर्षी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही विद्युत तारा तशाच आहेत.

विद्युत पोल उपलब्ध, मागणी केल्यास तत्काळ दुरूस्ती
शहर व तालुक्यात बहुतांश झुकलेले विद्युत पोल व विद्युत तारा लोंबकळत असल्यास ग्राहकांच्या तक्रारीनुसार कामे करण्यात येत असून मध्यंतरी विद्युत पोल उपलब्ध नसल्या मुळे काही कामे प्रलंबित होती. सध्या विद्युत पोल उपलब्ध झाले असून शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तात्काळ दुरुस्ती केली जाईल.
आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता.

तारा हाताला लागत असल्याने जीवाला धोका
अनेक दिवसापासून शेतातील वीज तारा हाताला पोहोचतील अशा स्थितीत असल्याने धोकादायक बनल्या आहेत. यामुळे शेतात जाणे जिकिरीचे झाले. कर्मचाऱ्यांना कल्पना दिली आहे. वरिष्ठांनी माहिती देवून हे काम करण्यात येईल असे सांगितले.
प्रभाकर समाने, जकेकूर.

बातम्या आणखी आहेत...