आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसाची हजेरी:उमरगा, लोहाऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; आंबा, ज्वारी, गव्हाचे नुकसान, पत्रे उडाले

उमरगा / लोहारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील कुन्हाळी परिसर व लोहारा शहर परिसरात अर्धा तास झालेल्या वादळी वारा व गारांच्या अवकाळी पावसाने रविवारी सायंकाळी झोडपून काढले. तालुक्यात कुन्हाळी, कदमापूर, हंद्राळ, त्रिकोळी परिसरात वारे जास्त आणि पाऊस कमी असल्याने शिवारासह गावातील पत्रे, अनेक ठिकाणी झाडे मोडली तर शेतातील व घरावरील पत्रे उडाल्याने साहित्याचे नुकसान झाले. सध्या शेतशिवारत असलेल्या ज्वारी, गहू आणि कांद्याचे पावसाने नुकसान झाले तर आंब्यांच्या कच्च्या कैऱ्यांचा रानावर सडा झाला आहे. रात्रीच्या साडेदहापासून मेघगर्जना सुरू होती. अधूनमधून पावसाच्या सरी व जोराच्या वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा व मोबाइल टॉवरमध्ये बिघाड झाल्याने काही काळ संपर्क तुटला होता. आंब्याचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती उपसरपंच भैरू लेंडवे यांनी दिली.

लोहारा शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. लोहारा शहर, कानेगाव, नागुर, कास्ती, बेलवाडी, शिवकरवाडी, हिप्परगा (रवा), लोहारा खुर्द येथे अवकाळी पाऊस झाला. दरम्यान विजांचा कडकडाटही सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...