आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:उमरगा, लोहारातील महाविद्यालयांची बारावीतील यशाची परंपरा कायम ; छत्रपती शिवाजी महाविद्यालयात परीक्षेत तीनही शाखेत मुलींचा डंका

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत शिक्षण संस्था संचलित शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२२ बारावी बोर्ड परीक्षेत महाविद्यालयाचा एकूण निकाल ८९.९१ टक्के लागला असून श्रुती शहाजी पाटील विज्ञान शाखेतून ९२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून एक हजार १२१ विद्यार्थी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक हजार आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये १६३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा जोपासली आहे. विशेष म्हणजे तीनही शाखेतून मुलीच प्रथम आल्या आहेत. उज्ज्वल यश प्राप्त करत गुणवत्ता जोपासल्याबद्दल सर्व यशस्वी बारावी च्या विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ.जी. एच जाधव, उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक प्रा. एस ए. महामुनी आदींनी अभिनंदन करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शनही केले. लोहारा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के लागला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातील एकूण २६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्रावीण्यासह ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयीन वाणिज्य शाखेतून वैभवी मुकुंद रसाळ हिने ९१.३३ टक्के गुण मिळवत प्रथम, सायली दादासाहेब गंगणे हिने ९०.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर स्वप्नील सतीश होळकर याने ८७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून मयुर बिराजदार याने ८९ टक्के गुण मिळवत प्रथम, रेणुका सूर्यवंशी हिने ८८.५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर रिया शेख हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९९.१० टक्के लागला आहे. महाविद्यालयातील कला शाखेतून शुभांगी आप्पासाहेब कांबळे हिने ८२.५० टक्के गुण मिळवत प्रथम, राणी कदम हिने ७७.५० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.

शिवाजी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९४.९० टक्के लागला असून त्यात श्रुती पाटील ९२ टक्के घेऊन घेवून प्रथम आली आहे. श्रुती कमलाकर तेलंग ९० टक्के द्वितीय, देवयानी सतीश जगताप ८९.३३ टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे. विज्ञान शाखेतून विशेष प्रावीण्यासह १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेचा निकाल ८०.१६ टक्के लागला असून भारती मन्मथप्पा दामशेट्टी ८५.३३ टक्के घेऊन प्रथम, पूजा शिवाजी भोसले ८३.३३ टक्के द्वितीय तर रेश्मा गुलाब शेख ८१.३३ टक्के घेऊन तृतीय आली असून सात विद्यार्थी विशेष प्रावीण्यात आलेत.वाणिज्य शाखेचा निकाल ९२.७२ टक्के लागला असून दीपाली राजेंद्र भोसले ८६ टक्के घेऊन प्रथम आली. वाणिज्य शाखेत श्रध्दा तानाजी माने ८५.५० टक्के द्वितीय तर सरस्वती सुधाकर मुगळे ८५ टक्के घेऊन तृतीय आली. यांच्यासह १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त आहेत. महाविद्यालयाचे एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९१.८९ टक्के लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...