आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर वसुलीसाठी नगरपालिकांकडे अवघे १७ दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी सर्वाधिक ९८.९८ टक्के कर वसुली उमरगा नगर पालिकेची आहे. सर्वात कमी ५३.९१ टक्के वसुली कळंब पालिकेची आहे. कमी वसुली असणाऱ्या पालिकांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. नगरपालिकांचा निम्मा कारभार हा उत्पन्नाचे मोठे साधन असलेल्या कर वसुलीवर असतो. मात्र, ११ महिन्यानंतरही जिल्ह्यातील नगरपालिकांची वसुली जेमतेमच आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पालिकांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळत असल्याने त्यातून खर्चाचे प्रयोजन व्हायचे. मागील ११ महिन्यांपासून हा निधीच शासनाकडून वितरीत झालेला नाही. त्यामुळे अनेक पालिका अडचणीत आल्या. त्याचा सर्वाधिक फटका धाराशिव पालिकेला बसत आहेत. धाराशिव पालिकेची वसुली ८० टक्क्यांपुढे पुढे गेली नाही. दुसरीकडे तीन नगरपालिकांनी कर वसुली ६० टक्क्यांच्या आतच असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या १० मार्च रोजीच्या अहवालातून दिसून येते.
पाणीपट्टी वसुलीत धाराशिव अग्रेसर
पाणीपट्टी वसुलीत धाराशिव पालिका प्रथम असून ९०.३० टक्के वसुली झाली आहे. यात उमरगा पालिकेची ८५.२५ टक्के वसुली आहे. यातही कळंब पालिका तळाला असून त्यांची वसुली केवळ ३६.६२ टक्के आहे. परंडा पालिकेने ४० टक्के पाणीपट्टी वसूल केली.
शिक्षण करातही उमरगा पालिकाच पुढे
शिक्षण कर वसुलीतही उमरगा पालिका पुढे असून शंभर टक्के वसुली यांनी केली आहे. नळदुर्ग ९६ टक्के वसुली आहे. येथेही कळंब पालिका मागेच आहे. रोहयो करात नळदुर्ग पालिकेने सर्वाधिक ९९.७६ टक्के वसुली केली. यातही कळंब पालिका पिछाडीवर आहे.
सुविधा दिल्याने वसुली
नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. भोंगा लावून कर भरण्याचे आवाहन केले. वेळेवर मागणी पत्र उपलब्ध केले. डिसेंबरनंतर सर्वांना कर लागणार असल्याचेही समजून सांगितले. त्यामुळे नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढला. अद्यापही पूर्ण शंभर टक्के वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. -रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी, नगर परिषद, उमरगा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.