आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा:उमरगा पालिका, प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेच्या फोडा-फोडीनंतर कोणता भाग कोणत्या प्रभागात समाविष्ट केला जाणार व हक्काच्या मतदारांचे निरीक्षण कार्यकर्ते करत आहेत.

पालिका प्रशासनाने मंगळवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मंगळवारपासून सोमवारपर्यंत (दि. २७) या प्रारूप प्रभाग रचना मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. त्याच्यानंतर एक जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील. पाच जुलैला मतदार केंद्राची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान मंगळवारी आठ लोकांनी ज्या त्या संबंधित प्रभागाच्या मतदार याद्या निरीक्षणासाठी घेतल्या आहेत.