आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:आइस हॉकीमध्ये उमरगा संघाला सुवर्ण

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ राज्यातील कोची शहरात नवव्या राज्यस्तरीय आइस हॉकी स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या स्पर्धेत तालुक्यातील स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत ज्युनिअर गटाने सुवर्ण तर वरिष्ठ गटाने रौप्य पदक पटकावले. स्पर्धेत जिल्ह्यास मानाचे स्थान प्राप्त केल्याबद्दल मंगळवारी (२९) शहरात व्यापारी महासंघ अन् नागरिकांच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

नवव्या राज्यस्तरीय आइस हॉकी स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. ज्युनियर संघात तालुक्यातील ओम राठोड, गणेश गालीपिल्ली यांनी सुवर्णपदक आणि सिनियर संघात साई राठोड याने पौप्य पटकावले आहे. लद्दाख येथे होणाऱ्या राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धेत महिला सिनिअर संघात रोहिणी बनसोडे, शिवनंदा अतनुरे यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...