आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेतल्‍याप्रकरणी अटक:वीस हजारांची लाच घेणाऱ्या उमरगा तहसीलदारांना अटक

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतामध्ये घराच्या बांधकामासाठी चार ट्रक वाळूच्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार राहुल पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूम येथील एका तक्रारदाराने घरबांधकामाला चार ट्रक वाळू नेण्यासाठी उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी पाटील यांनी चार ट्रक वाळूसाठी वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार, अशी चार वाहनांसाठी वीस हजार रुपयांची मागणी केली होती. बुधवारी (२४ आॅगस्ट) दुपारी कारवाई झाली.

बातम्या आणखी आहेत...