आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील २३ ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडणूकीसाठी रविवारी (१८) एकूण ५५ हजार ९७६ मतदारांपैकी ४०७५५जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २१९११ पुरूष तर १८८४४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. काही गावात किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मंगळवारी (२०)सकाळी आठ वाजता शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील २३ ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आणि २३ गावात सरपंचपदासाठी ६९ आणि २३३ सदस्यांसाठी ५२० जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. रविवारी १०२ मतदान केंद्रावर सकाळी साडे सातपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. एकूण ५५हजार ९७६ मतदारांपैकी ३० हजार ४७ पुरुष, २५९२८ महिला व इतर एक मतदानाचा हक्क बजावत आहेत.
यापैकी प्रत्यक्ष मतदानाची स्त्री पुरूष आकडेवारी सायंकाळी वरीलप्रमाणे प्राप्त झाली. सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत १२.८४ टक्के मतदान झाले होते. सकाळी साडेअकरा पर्यंत ३१.०३ टक्के मतदान झाले. दुपारी दिड वाजेपर्यंत १४५१८ पुरूष, १३५३९ महिला असे एकूण २८ हजार ५७ मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी ५०.१२ टक्के मतदान झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.