आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह उमरगा तालुक्यातील बेडगा आणि डिग्गी परिसरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
मागील चार दिवसांपासून उमरगा शहरासह बेडगा परिसरात पाऊस होत असल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. शिवारात सोयाबीनसह अन्य पिकांसोबत ऊस व फळबागा पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जोरदार होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. डिग्गी मार्गावरील बेडगा नदीवरील फरशी पुल चार दिवसात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने वाहतूक दोन तास बंद होती. बेडगा नदीवर पुलावरून पाणी वाहत असल्याने बेडगा, चंडकाळ, मानेगोपाळ व डिग्गीसह सीमाभागातील गावापुढे पावसाळ्यात वाहतूक बंद झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.
सोयाबीन, उसाचे नुकसान
उमरगा तालुक्यात जुलैमध्ये पाऊस लागून पडला आहे. सततच्या पावसामुळे अनेक तलाव तुडुंब भरले. ऊस, सोयाबीनसह इतर खरीप पिके व फळबागांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक भागातील रस्ते खचले आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी फरशी पुलासह रस्त्यालगतचा भराव वाहून गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.