आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौर्य दिन:उमरग्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने उमरगा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भीम अनुयायांनी, बहुजन समाजबांधवांनी अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन व पूजन करण्यात आले. यावेळी भंते सुमंगल यांनी बुध्दवंदना, पंचशील घेवून बुध्द पूजा करण्यात आली.

या कार्यक्रमाला दिलीप भालेराव, कमलाकर सूर्यवंशी, बाबा मस्के, राजु सूर्यवंशी, दिगंबर भालेराव, यादव जाधव, मिलिंद कांबळे, चंद्रकांत काळे, ॲड. मल्हारी बनसोडे, धीरज कांबळे, प्रकाश दुणगे, भारतीय बौद्ध महासभेचे संतोष सुरवसे आदींनी अभिवादन केले. यावेळी विजयकुमार सूर्यवंशी, सुनिल वाघमारे, राजू बिराजदार, राजू कांबळे, शिवाजी जाधव, सतीश टोपगे, सुभाष काळे, बाबा मस्के, अविनाश भालेराव, नवनाथ गायकवाड, तानाजीराव सूर्यवंशी यांच्यासह अनुयायांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

भीमा कोरेगाव शोर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पूज्य भंते सुमंगल, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, कार्यालय प्रमुख आविनाश भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, उमाजी गायकवाड, जीवन सूर्यवंशी, अशोक गायकवाड, नवनाथ गायकवाड यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...