आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या क्रांतिताई व्हटकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमरगा महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी निवड केली आहे. सोमवारी (दि. ५) उमरगा येथे झालेल्या महाप्रबोधन सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद -कळंब मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना नेते बाबा पाटील, लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरणाळे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उपतालुकप्रमुख सुधाकर पाटील, माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले, उमरगाचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, माजी तालुकाप्रमुख विजयकुमार नागणे, माजी उपतालुकप्रमुख भगवान जाधव, कमलाकर चव्हाण, बजरंग जाधव, माजी जि. प. सदस्य दीपक जवळगे, गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.