आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूरचे सौंदर्य धोक्यात:महाद्वार परिसरामध्ये अनधिकृत होर्डिंग्ज

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाचा बंदी आदेश झुगारत तीर्थक्षत्र तुळजापूर नगरीमध्ये महाद्वार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले असून यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरचे सौंदर्य धोक्यात आले आहे.तुळजापूर नगरपालिका तसेच पोलिस प्रशासन तुळजाभवानी मंदिर परिसरातील विनापरवाना होर्डिंग्जकडे डोळेझाक करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक तीर्थक्षेत्र तुळजापुरात येत असतात.

परंतु पायाभूत सुविधांच्या अभावी येणाऱ्या भाविकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तुळजापूर शहरात प्रवेश करताच ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जने भाविकांचे स्वागत होत आहे. अनेक होर्डिंग्जमुळे तुळजाभवानी मंदिराचा महाद्वार परिसर झाकोळला गेला आहे. यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईची मागणी होत आहे.

बेशिस्त पार्किंगसह फेरीवाल्यांचा विळखा
तुळजाभवानी मातेच्या महाद्वार परिसर बेशिस्त पार्किंग, अतिक्रमण आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला असून यामुळे भाविकांना देवीचा रस्ता शोधताना दमछाक होत आहे. त्यातच भिक्षेकऱ्यांच्या झोंबाझोंबीमुळे भाविकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चिंतेचा विषय आहे

बातम्या आणखी आहेत...