आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात उंटसवारी:भुयारी गटारीने सांडपाण्याची समस्या सोडवली, खड्डेमय रस्त्यांची वाढवली

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या काही महिन्यांपासून भुयारी गटारींचे काम सुरू होते. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले, तर काही ठिकाणी अजूनही ते अपूर्ण आहे. त्यासाठी शहरातील बहुतांश भागात रस्ते खोदण्यात आले होते. खोदलेल्या रस्त्यांची काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे, तर काही भागात रस्ते खोदलेल्या अवस्थेतच आजही कायम आहेत. काही ठिकाणी भुयारी गटारींचे काम पूर्ण झाले आहे.तरी देखील मात्र रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पालिका प्रशासनाने समस्येची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

या भागात समस्या : शहरातील भागवत गल्ली, कोंबडी बाजार परिसर, भाजीपाला मार्केट, स्टेशन रोडवर मंगलमूर्ती पतपेढीपर्यंत रस्ता करण्यात आला आहे. तर पुढे या भागातील रस्ते खड्डेय आहेत. सुभाष चौक ते स्टेशनपर्यंतचा रस्ता खड्ड्यांत हरवला आहे. पिंपळे रोडचीही अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी गटारीसाठी खोदलेल्या रस्त्यांचा भराव पावसामुळे खचल्याने, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पिंपळे रस्त्यावरुन कॉलन्यांमध्ये जाणाऱ्या जोडरस्त्यांवरही खड्डे आहेत.

का रखडली रस्त्यांची डागडुजी?
यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे भुयारी गटारीसाठी खोदलेले रस्ते चिखलमय झाल्याने दुरुस्ती करता आली नाही. आता पाऊस थांबल्याने ज्या भागात भुयारी गटार पूर्ण झाली आहे, त्या भागात ठेकेदाराने रस्त्यांच्या दुरुस्तीला गती द्यावी. यासंदर्भात पालिकेने ठेकेदाराला निर्देश दिल्यास समस्या सुटेल.

शासनाकडे प्रस्ताव दिला आहे
काही रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे. परंतु भुयारी गटारींचे काम अपूर्ण असल्याने कामाला सुरुवात करता येत नाही. काही रस्त्यांसाठी निधीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. प्रशांत सरोदे, सीओ

ठेकेदाराचे नाव सांगितले जाते
पिंपळे रस्त्याबाबत वारंवार प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र ठेकेदारामार्फत दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले जाते. आता रस्त्यांची दुरुस्ती व्हायला हवी. विजय पाटील, रहिवासी, पिंपळे रोड परिसर

बातम्या आणखी आहेत...