आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:वडगावकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाची अखंडित सेवा

उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वडगावकर परिवाराच्या वतीने गेली सात वर्षांपासून श्रीगणेश विसर्जनदिनी भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता महाप्रसादाचे आयोजन करतात. यासाठी वडगावकर परिवारातील रमेश वडगांवकर, महेश वडगांवकर, शरद वडगांवकर, डॉ. विशाल वडगांवकर, मीरा वडगांवकर, सौ. मधुरा वडगांवकर , डॉ. रेणुका वडगांवकर,चि.शेखर, आदित्य वडगांवकर,कु. वैष्णवी तसेच सर्व वडगांवकर परिवार सदस्यांचा समावेश आहे. आचरेकर परिवार इंदूताई श्रीकांत दिक्षीत याही या कामात परिश्रम घेतात.

या उपक्रमासाठी स्वंयसेवक म्हणून जिल्हा संस्कार भारतीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, मार्गदर्शक शेषनाथ वाघ, मेलडी स्टार समूहाचे प्रवर्तक युवराज नळे ,धनंजय कुलकर्णी, राधेश्याम बजाज व त्यांचे कर्मचारी त्याच बरोबर व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी महाप्रसाद वाटपास मदत केली. असंख्य गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...