आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी संवाद परिषद:गुणरत्न सदावर्तेंचे बॅनर अज्ञाताने फाडले; उस्मानाबाद संवाद परिषदेवरून वाद

उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबादमध्ये आज स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे, यासाठी एक संवाद परिषद आयोजित करण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पुढाकारने मराठवाडा आणि वेगळा विदर्भ संवाद परिषदेचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. मात्र याला उस्मानाबादमध्ये मोठा विरोध होताना दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दुपारी 4 वा.होणाऱ्या कार्यक्रमाचे बॅनर अज्ञाताने फाडले आहे. उस्मानाबादमध्ये आज स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा वाद चांगलाच पेटणार असे दिसून येत आहे. शिवसेना किंवा कोणीही विरोध केला तरी तो मोडून काढत आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा रेवण भोसले यांनी दिला आहे. तर प्रसंगी न्यायलयीन लढाई लढू असेही ते म्हणाले आहे. यामुळे आता दिवसभर स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

ही विघातक प्रवृत्ती - दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, संवाद परिषदेचे आयोजन करत गुणरत्न सदावर्तेंना पुढे कुणी केले? हे सर्वांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. सदावर्तेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत अशी दुटप्पी भूमिका मांडायची, असे काही जणांचे सुरू आहे, असेही अंबादास दानवेंनी म्हटले आहे. तर महाराष्ट्राचे वेगळे वेगळे प्रांत करणे ही विघातक प्रवृत्ती आहे. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, मराठवाड्यावर विकासाच्या दृष्टीने नक्कीच अन्याय झाला असेल, मात्र त्यामुळे वेगळे निघण्याची भूमिका घेणे हे चुकीचे आहे.

काय आहे मागणी?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मिती व्हावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मागसलेपणा आहे, तो संपविण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...